झवेरे पूनावाला यांना‘लेजेंड ऑफ इंडियन हॉर्स रेसिंग’ पुरस्कार.
हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून भारतीय हॉर्स रेसिंग उद्योगाच्या मेहनतीची पोचपावती.
पुणे, NVnews प्रतिनिधी- भारतीय घोड्यांच्या शर्यतींच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, योगदानाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ उद्योगपती झवेरे पूनावाला यांना म्हैसूर येथे झालेल्या टर्फ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या रेसिंग एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या ‘लेजेंड ऑफ इंडियन हॉर्स रेसिंग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून भारतीय हॉर्स रेसिंग उद्योगाच्या मेहनतीची पोचपावती असल्याची भावना व्यक्त केली. तसेच स्पर्धेच्या युगात डिजिटल माध्यमे आणि यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय घोड्यांच्या शर्यतींना जागतिक स्तरावर मिळणारी प्रसिद्धी, यामुळे या क्षेत्राला नवी ओळख मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगातील तरुणाई अर्थातच 'जेन झी' पिढीला घोड्यांच्या शर्यतींच्या क्षेत्राकडे आकर्षित करणे हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तरुणांना या पारंपरिक क्षेत्राची आवड निर्माण करण्यासाठी नवनवीन प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले . भारतीय हॉर्स रेसिंगला जागतिक ओळख मिळवून देण्यापासून ते नव्या पिढीला या क्षेत्राशी जोडण्यापर्यंत, झावराय पूनावाला यांचे मोठे योगदान असून देशाच्या जडणघडण यात पूनावाले कुटुंबीय अग्रसेर आहेत.

