BREAKING• पुणे वार्ता
पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना लाखोंचे नुकसान.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)
पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या दोन घटना;आगीत मोठे नुकसान झाल्याची शक्यता.
पुणे,28 ऑक्टोबर पिंपरी-चिंचवड शहरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून, आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पिंपरी गावातील वैभवनगर परिसरात राडारोड्याला आग लागली, तर वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौक परिसरात पोळी-भाजीच्या दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगींमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही..
ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:

